चीनचे (China) सर्वात मोठ्या रॉकेट Long March 5B 8 मे रोजी पृथ्वीवर धडकणार होते. मात्र ते पृथ्वीवर नेमके कोठे कोसळणार याचा अंदाज नसल्याने सर्वत्र चितेंचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही वेळापूर्वीच हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले. या रॉकेटचे बहुतांश अवशेष पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच नष्ट झाले, अशी माहिती Reuters ने दिली आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात चीनने अंतराळात सोडलेले हे रॉकेट नियंत्रणाबाहेर गेले.
Long March 5B रॉकेटने आज 10.24 मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आणि त्यानंतर हिंदी महासागरात कोसळले. हिंदी महासागरात मालदीवच्या पश्चिमेला रॉकेट पडल्याचा प्रभाव दिसून येत आहे. रॉकेटचे बरेच पार्ट्स पृथ्वीच्या वातावरणात जळून गेले, अशी माहिती China Manned Space Engineering Office कडून देण्यात आली आहे.
ANI Tweet:
Remnants of China's biggest rocket landed in the Indian Ocean, with the bulk of its components destroyed upon re-entry into the Earth's atmosphere: Reuters
— ANI (@ANI) May 9, 2021
29 एप्रिल रोजी चीनच्या Hainan island वरुन Long March 5B लॉन्च झाल्यानंतर त्याचे काही पार्ट्स हवेमधून खाली पडताना लोकांना दिसले होते. मागील महिन्यात केलेल्या Long March 5B लॉन्च हे 5B वेरिएंटचे मे 2020 नंतरचे दुसरे यान होते. गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Long March 5B चे पार्ट्स आयव्हरी कोस्टमधील काही इमारतींवर पडले होते. या घटनेत कोणेतीही जिवीतहानी झाली नव्हती.
पृथ्वीचा बहुतांश भाग हा पाण्याने व्यापलेला असल्यामुळे वस्तीच्या ठिकाणी रॉकेट्चे पार्ट्स पडण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु, चीनने आता नुकत्याच लॉन्च केले्ल्या रॉकेटच्या या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल होते. मात्र हिंदी महासागरात रॉकेट कोसळल्याने धोका टळला आहे.