पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू मुलगी बनली पोलीस अधिकारी, पुष्पा कोहली सहायक निरीक्षक पदावर रुजू
प्रतीकात्मक फोटो | (PTI photo)

पाकिस्तान (Pakistan) मध्ये प्रथमच एक हिंदू मुलगी पोलिस अधिकारी बनली आहे. पाकिस्तानी हिंदू महिला पुष्पा कोहली (Pushpa Kohli) सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून सिंध पोलिसात दाखल झाली. पाकिस्तानी मानवाधिकार आणि ब्लॉगर कपिल देव (Kapil Dev) यांनी ट्विटरवर पोस्ट करून पुष्पा विषयी सांगितले. पुष्पा, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवाशी आहेत. सिंध पोलिसात एएसआय होणारी पुष्पा पाकिस्तानमधील पहिली हिंदू महिला आहे. सिंध लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत पुष्पा यांनी सिंध पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षक पद मिळवले. मानवाधिकार कार्यकर्ते कपिल देव यांनी पुष्पा कोहलीला एएसआय (ASI) बनविण्याविषयी माहिती दिली.

ट्विटरवर ही बातमी सामायिक करताना त्यांनी लिहिले, "सिंध लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सहायक उपनिरीक्षक म्हणून पुष्पा कोहली हिंदू समाजातील पहिली मुलगी ठरली आहे."

इंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार सुमारे 90  लाख हिंदू पाकिस्तानमध्ये राहतात आणि सिंध प्रांतात हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे. यावर्षी जानेवारीत हिंदु समुदायाची सुमन पवन बोदानी पाकिस्तानच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या. त्या देखील सिंध प्रांताच्या रहिवासी आहे. शिवाय, मार्च 2018 मध्ये पाकिस्तानी पीपल्स पार्टीच्या नेत्या कृष्णाकुमारी यांनी संसदेची निवडणूक जिंकली होती. हिंदू समुदायातून येऊन खासदार बनलेल्या त्या पहिल्याच महिला ठरल्या.