video: प्रिंस हॅरीला रॉयल बेबी मुलगी हवीय ? सिडनीत दिली कबुली
प्रिंस हॅरी Picture Courtesy: Twitter

प्रिंस हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या आयुष्यात लवकरच नवा पाहुण्याचं आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मेगन मार्केल गरोदर असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर जगभरातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावरही याची प्रचिती आली आहे.

चाहत्यांकडून शुभेच्छा !

सिडनीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये हॅरी सहभागी झाला होता. तेथे उपस्थितांमधून एका महिलेने "I hope it's a girl!" म्हणजेच (रॉयल बेबी) मुलगी असावी... असे म्हणाली. हॅरीनेही चालताना त्या महिलेला प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,' मलाही तसंच वाटतयं.' मेगन आणि हॅरी यांचं बाळ ब्रिटनच्या राजघराण्यातील 7 वं दावेदार असणार आहे. हॅरीच्या चाहत्यांनी हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मे २०१८ मध्ये हे दाम्पत्य विवाह बंधनात अडकले. २०१९ च्या उन्हाळ्यात ड्यूक आणि डचेस ऑफ सक्सेस म्हणजेच मेगन आणि हॅरी यांच्या बाळाचं आगमन होणार आहे