Pakistani Beautiful Teacher Photo | (Photo Credit - Twitter)

कला ही एक अशी गोष्ट आहे, तुम्ही कोणीही असा. ती तुम्हाला आपल्या कवेत घेतेच. त्याची व्याप्ती कमी अधिक असेल. पण, आयुष्यात कोणतीच कला येत नसलेला किंवा केली नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. आजकाल सोशल मीडियाचा जमाना असल्याने ही कलाकारी काहीशी अधिकच प्रखडपणे लोकांसमोर येते. ही कला कधी कधी कौतुकास पात्र ठरते तर कधी कधी विनोदाचा विषय होते. कधी मधी ती खिल्लीचाही विषय ठरु लागली आहे. सोशल मीडियावर (Social Media) पाकिस्तानातील एका विद्यार्थ्याने आपल्या महिला शिक्षकाचे (Pakistani Beautiful Teacher Photo) काढलेले एक चित्र असेच व्हायरल झाले आहे. हे चित्र पाहून केवळ शिक्षीकेनेच नव्हे तर युजर्सनीही डोक्यावर हात मारला आहे. पण, विद्यार्थ्याचा निष्पापपणा पाहून त्याचे कौतुकही केले आहे.

निशात असे पाकिस्तानातील या महिला शिक्षिकेचे नाव असल्याचे समजते. आपल्या विद्यार्थ्याने काढलेले आपले चित्र तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे आणि आपण कसे दिसतो आहोत? असा प्रश्नही विचारला आहे. 'वन इंडिया' ने दिलेल्या वृत्तानुसार, निशात यांनी एका पोस्टमध्ये पहिल्यांदा आपला मूळ फोटो (रियल पिक्चर) पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क वापरला आहे. त्यांनी मास्क वापरला असला तरीही स्पष्ट दिसते की, निशात या अगदीच तरुण आणि खूपच सुंदरही आहेत. (हेही वाचा, ऐकावं ते नवलचं! 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या)

ट्विट

सोशल मीडियात आपले फोटो पोस्ट करत निशात यांनी कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, मी फर्स्ट ग्रेडरला माझे एक चित्र काढण्यास सागितले. परोंती त्याचे वास्तव रुप जे पुढे आले ते पाहून मला फार हसू आले. कशी दिसत आहे मी पेंटींगमध्ये? नशातने सोशल मीडियावर पोस्ट केलेली चित्रे फारच विनोदी आहेत. आपल्या अनेक विद्यार्थ्यांची चित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना गुणदानही केले आहे. एक फोटो शेअर करत त्यांना विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, 10 पैकी 6.5 गुण दिले आहेत. निशात यांनी एक एक फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन लिहीले आहे. एका कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एक कमजोर सुरुवात. परंतू, केसांवर प्रेम करा.

ट्विट

ट्विट

ट्विट

दरम्यान, निशात यांच्या या पोस्टला आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 150 लोकांनी रिट्विट केले आहे. निशात यांनी ट्विटरवर शेअर केलेही ही चित्रे पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. ट्विटर युजर्ससुध्या या पोस्टपाहून मजेशीर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.