President Ram Nath Kovind. | (Photo Credits: DD News)

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) सोमवारपासून आईसलँड, स्विर्त्झलँड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी  कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून उडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती भारताने केली होती. मात्र चिडलेल्या पाकिस्तानने ती पूर्णतः धुडकावली आहे. पाकिस्तानने रामनाथ कोविंद यांच्या विमानाला आपल्या हद्दीतून उडण्याची परवानगी नाकारली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी शनिवारी ही माहिती दिली. पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

17 सप्टेंबर पासून रस्त्रापाती रामनाथ कोविंद तीन दिवसांच्या प्रदेश दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते भारतात घडलेल्या दहशतवादी घटनांसंदर्भात इतर देशांच्या प्रमुख नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत. मात्र त्यांच्या विमानाला पाकिस्तानने आपल्या हद्दीतून उडण्यास नकार दिला आहे. फेब्रुवारीमध्ये भारताने एयर स्ट्राईक केला होता, त्यानंतर पाकिस्तानकडून एअरस्पेस बंद करण्यात आली. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे त्यामुळे आम्ही ही परवानगी देऊ शकत नाही असे मेहमूद कुरेशी यांनी सांगितले आहे.

त्यावेळी पाकिस्तानने घेतालाला निर्णय भारतासाठी महागात पडला होता. पाकिस्तानने काही निर्बंध शिथिल केले होते मात्र भारताचे विमान आपल्या हद्दीमधून उडण्याची परवानगी नाकारली होती. त्यात भारताने कलम 370 रद्द केल्यावर पाकिस्तान अजूनच चिडला आहे. अशा सर्व गोष्टींमुळे पाकिस्तानने रामनाथ कोविंद यांच्या विमानाची परवानगी नाकारली आहे.