दहावी नापास असणारे पायलट चालवतात शासकीय विमानं, पाकिस्तानचा आंधळेपणाने कारभार
पाकिस्तान शासकीय एअरलाईन्स (फोटो सौजन्य- फेसबुक)

Lahor:पाकिस्तान(Pakistan) येथे दहावी नापास असलेले पायलट शासकीय विमान चालवत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या पाच पायलट यांना अटक करण्यात आली आहे.

'डॉन' या वृत्तपत्राने जाहीर केलेल्या माहितीमध्ये पाकिस्तानच्या विमान भरतीतील हा खेळखंडोबा उघडकीस आला आहे. तर सात पायलट यांनी खोटे प्रमाण पत्र दाखवून नोकरी मिळवली आहे. तसेच 50 पायलट यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. या प्रकारामुळे न्यायमूर्ती इजाजुल अहसान यांनी दहावी नापास व्यक्ती बस चालवू शकत नाहीत आणि शासकीय विमान त्यांच्याकडून कशी काय उडवली जात आहेत असा प्रश्न उभा केला आहे. अशा प्रकारच्या हलगर्जी पायलटांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात असूनही नापास व्यक्तींना नोकऱ्या का दिल्या असा ही जाब विचारण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांनी सादर केलेली शैक्षणिक कागदपत्रे ही खोटी असल्याचे उघडकीस आले. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे प्रशासनाला दिली नसल्याने त्या प्रकरणी सुनावणी सुरु होती. तसेच विमान भरतीतील 400 पायलट कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे.