Pakistan got Trolled over Mission 2022 (Photo Credits-Rohit Agarwal/Twitter)

भारताच्या (India) चांद्रयान-2 च्या (Chandrayaan 2) मोहिमेला यश मिळाले आहे. त्यानंतर सर्वत्र देशभरात आनंदाचे वातावरण दिसून आले. मात्र भारताच्या चांद्रयान 2 च्या मिशननंतर लगेच पाकिस्तानने (Pakistan) सुद्धा आम्ही 2022 मध्ये अंतराळात पहिला नागरिक पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने केलेल्या या घोषणेवर नेटकऱ्यांनी त्यांची सोशल मीडियात नेहमीप्रमाणेच खिल्ली उडवली आहे.

पाकिस्तान पंतप्रधान इमारान खान (Imran Khan) यांच्या सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी 2022 मध्ये पाकिस्तान त्यांचा पहिला व्यक्ती अंतराळात पाठवणार असल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत एक ट्वीट करत चौधरी यांनी असे म्हटले आहे की, अंतराळाताच्या मोहिमेसाठी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. यामध्ये पहिल्या पन्नास जणांची निवड केली जाईल. त्यानंतर निवड केलेल्यांपैकी फक्त 25 जण या मोहिमेसाठी निवडून ते 2022 मध्ये ही मोहिम पार पाडणार आहेत. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केलेल्या या दाव्यावर आता सोशल मीडियात त्यांना ट्रोल केले जात आहे. (पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडून कबुली; 'पाकमध्ये 40 दहशवादी संघटना सक्रिय होत्या,अमेरिकेला 15 वर्ष नव्हता थांगपत्ता')

पाकिस्तानला करण्यात आलेले ट्रोल: 

तर इस्रोचा (ISRO) महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान-2 (Chandrayaan 2)गेल्या तीन दिवसांपूर्वी अवकाशात झेपावले. इस्रोच्या या कामगिरीबद्दल अवघ्या जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता इस्रोने त्यांच्या पुढील प्रकल्पाची तयारी सुरु केली आहे. इस्रोचे पुढील मिशन हे सूर्यावरील असेल. या मिशनचे नाव आदित्य –एल1 (Aditya-L1)असून, 2020 मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.