TikTok (PC - pixabay)

गलवान खोऱ्यातील वादानंतर भारताने चीनी अॅपवर बंदी टाकली होती. यावेळी बाईटडान्स कंपनीच्या टिकटॉक अॅपवर देखील बंदी घातली होती. आता भारतानंतर नेपाळनेही चीनच्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म टिकटॉकवर बंदी घातली आहे. नेपाळ सरकारने सोमवारी टिकटॉकवर बंदी घातली. कारण त्याचा सामाजिक सौहार्दावर नकारात्मक परिणाम होत आहे, असं नेपाळमधील सरकारचं म्हणणं आहे. सरकारच्या प्रवक्त्या रेखा शर्मा यांनी सांगितले की, या संदर्भात आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये चिनी अॅप TikTok वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या म्हणाल्या की, टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून लागू केला जाईल. (हेही वाचा - UK New Foreign Secretary: ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती, पंतप्रधान ऋषी सुनक यांचा निर्णय)

पाहा पोस्ट -

ही बंदी नेपाळ सरकारने TikTok मूळे समजावर होत असलेल्या नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन टाकली आहे. याबाबत नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळाचीही गुरुवारी बैठक झाली. यामध्ये, Facebook, X (पूर्वीचे Twitter), TikTok आणि YouTube यासह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देशातील संपर्क कार्यालये उघडणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नेपाळी काँग्रेसचे सरचिटणीस गगन थापा यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, 'टिकटॉकवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. सरकारने सोशल मीडिया साइट्सचे नियमन करावे. हा निर्णय चिनी नेटवर्किंग प्लॅटफॉर्मसाठी धक्कादायक आहे.