आतंकवादी गोपाल चावला सोबत नवजोत सिंग सिद्धू यांचा फोटो; पुन्हा वादाची शक्यता
आतंगवादी गोपाल चावला (Photo Credit: twitter )

पाकिस्तानला (Pakistan) गेल्यानंतर  नवजोत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) चांगलेच चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा ते वादात सापडण्याची शक्यता आहे. त्याचे कारण आहे नवजोत सिंग सिद्धू यांचा सोशल मीडियावर पोस्ट झालेला फोटो. या फोटोत सिद्धू खालिस्तानी आतंकवादी गोपाल सिंग चावलासोबत (Pro-Khalistan Leader Gopal Singh) दिसत आहेत. हा फोटो दिल्लीतील आमदार आणि अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा (Manjinder Sirsa) यांनी शेअर केला आहे.

गोपाल सिंग चावला हा मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंट हाफिज सईदचा निकटवर्तीय असल्याचे समजले जाते. त्याचबरोबर चावला पाकिस्तान शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे (Pakistan Sikh Gurdwara Parbandhak) महासचिव देखील आहेत. कर्तारपूरच्या (Kartarpur) पायाभरणी समारंभात आतंकवादी गोपाल सिंग चावला इमरान खान यांच्या सोबत फिरताना दिसला होता. त्यानंतर पाकिस्तानचे आर्मी जनरल कमर जावेद बाजवा यांची देखील त्याने भेट घेतली.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, "भारत, पाकिस्तानने आयोजित केलेल्या दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहयोग संघटना संमेलनात (SAARC) सहभागी होणार नाही. आणि जोपर्यंत पाकिस्तान त्याच्या आतंकवादी कारवाया बंद करत नाही तोपर्यंत दोन्ही देशात कोणतीही चर्चा होणार नाही. त्यामुळे भारत सार्क परिषदेत सहभागी होणार नाही. त्याचबरोबर सार्क परिषदेसाठी आलेल्या आमंत्रणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींही कोणतेही उत्तर दिले नाही."