चीन (China) मध्ये म्यानमारच्या राजदूताचा (Myanmar Ambassador) अचानक मृत्यू झाल्याची बाब नोंदवण्यात आली आहे. चीन मधील Kunming मध्ये ही घटना घडली असल्याचं वृत्त म्यानमारच्या अधिकार्यांकडून बिजिंग मध्ये सांगितले आहे. U Myo Thant Pe असं राजदूताचं नाव असून त्याच्या obituary मध्ये मृत्यूचं कारण लिहण्यात आलेले नाही. बिजिंग मधील डिप्लोमॅट्सच्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू हार्ट अटॅक मुळे झालेला असावा.
U Myo Thant Pe यांना शेवटचे शनिवारी चीन-म्यानमार सीमेवर असलेल्या Yunnan मध्ये स्थानिक अधिकार्यासोबत भेटताना पाहिल्याने वृत्तपत्रात सांगण्यात आले आहे. चीन मधील म्यानमार एम्बेसी कडून यावर अद्याप कोणतीही टीपण्णी करण्यात आलेली नाही.
U Myo Thant Pe यांची नेमणूक चीन मध्ये 2019 मध्ये करण्यात आली. फेब्रुवारी 2021 मध्ये म्यानमारच्या सैन्याने सत्ता हस्तांतरित केल्यानंतर ते त्यांच्या पदावर राहिले. हे देखील नक्की वाचा: China: बीजिंगमधील जोडप्यांना लग्नासाठी नोंदणी करताना Negative Nucleic Acid Test चा अहवाल दर्शवणे बंधनकारक.
2021 पासून चीन मध्ये अशाप्रकारे अचानक मृत्यू पावलेले ते चौथे राष्ट्रदूत आहेत. युक्रेनचे राजदूत Serhiy Kamyshev (65) यांचा फेब्रुवारी 2021 मध्ये Beijing Winter Olympics venue ला भेट देताना मृत्यू झाला होता. जर्मन चे राजदूत Jan Hecker (54) यांचा मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाला. बीजिंग मध्ये त्यांची पोस्टिंग होताच 2 महिन्यात त्यांना मृत्यूने गाठलं. फिलीपाईन्सचे राजदूत Jose Santiago "Chito" Sta. Romana (74) यांचा देखील एप्रिल महिन्यात चीन मधील Anhui प्रांतात मृत्यू झाला होता.