Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये बसचा भीषण अपघात, 18 जणांचा मृत्यू, 29 प्रवाशी जखमी
Accident (PC - File Photo)

Mexico Bus Accident:  मेक्सिकोमध्ये एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी व्हेनेझुएला आणि हैतीमधून प्रवाशांना घेवून जाणारी बस पलटली. या भीषण अपघातात दोन महिला, तीन लहान मुलांसह एकूण 18 जण दगावले आहे. ओक्साका आणि शेजारच्या प्यूब्ला राज्याला जोडणाऱ्या महामार्गावर पहाटे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. बस अपघातात एकून 29 जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, बसमध्ये 55 परदेशी नागरिक होते. टेपेलामेम या शहरात हा अपघात झाला.