Cows Die in Explosion: टेक्सास फार्ममध्ये स्फोटानंतर भीषण आग; 18 हजार गायींचा जळून मृत्यू
Cows Die in Explosion (PC - Facebook, Pixabay)

Cows Die in Explosion: अमेरिकेतील टेक्सास (Texas) मध्ये झालेल्या स्फोटात 18,000 हून अधिक गायींचा मृत्यू झाला. मंगळवारी साउथफोर्क डेअरी फार्म या डेअरी फार्मला आग लागली. रॉयटर्सने वृत्त दिले आहे की, ही घटना अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक आग ठरली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच डेअर फार्मकडून यांसदर्भात अद्याप कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही.

कॅस्ट्रो काउंटी शेरीफच्या कार्यालयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये इमारतीतून ज्वाला पसरत असल्याचे दिसत आहे. शेरीफच्या कार्यालयाने पुढे सांगितले की, अग्निशमन दलाच्या जवानांनी जळत्या इमारतीत अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका केली. अमेरिकेतील सर्वात जुन्या प्राणी संरक्षण गटांपैकी एक असलेल्या अॅनिमल वेल्फेअर इन्स्टिट्यूट (AWI) ने या आगीचे वर्णन भीषण केलं आहे. तसेच गोठ्यातील आग रोखण्यासाठी फेडरल कायद्यांची मागणी केली आहे. ज्यामुळे दरवर्षी हजारो जनावरे मारली जातात. (हेही वाचा -Dog Saves Child: पाळीव कुत्र्यांनी वाचवले शेजारील कुत्र्यापासून मुलाचे प्राण, पहा व्हायरल व्हिडिओ)

रॉयटर्सने एडब्ल्यूआयचा हवाला देत म्हटले आहे की, केवळ काही यूएस राज्यांनी अशा इमारतींसाठी अग्निसुरक्षा कोड स्वीकारला आहे आणि अशा आगीपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही संघीय नियम नाहीत.

AWI ने 2013 मध्ये अशा घटनांचा मागोवा घेण्यास सुरुवात केल्यापासून टेक्सासमधील आग ही गुरांचा समावेश असलेली सर्वात विनाशकारी आग आहे. गेल्या दशकात अशा आगीत सुमारे 6.5 दशलक्ष पशुधनाचा मृत्यू झाला आहे.