मार्क कार्नी | X

Justin Trudeau हे कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर Mark Carney कॅनडाचे 24 वे पंतप्रधान म्हणून शपथबद्ध झाले आहेत. Mark Carney हे आर्थिक धोरणनिर्मिती आणि गुंतवणुकीतील अनुभवी आहेत पण निवडून आलेल्या पदाचा त्यांना कोणताही पूर्व अनुभव नाही.Justin Trudeau यांच्यानंतर सत्ताधारी लिबरल पार्टीने Mark Carney यांना पाठिंबा दिला. संभाव्य व्यापार युद्धाच्या चिंतेदरम्यान कॅनेडियन लोकांना धीर देण्यासाठी मोठ्या संकटांच्या काळात दोन केंद्रीय बँकांचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या अनुभवावर आता त्यांची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.

Trade Disputes, मध्ये Mark Carney यांनी वॉशिंग्टनबद्दल ठाम भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की जेव्हा "कॅनेडियन सार्वभौमत्वाचा आदर केला जाईल" तेव्हाच ते डोनाल्ड ट्रम्पशी भेटण्यास सहमत होतील. त्यांनी शपथ घेतली की कॅनडा कधीही अमेरिकेचा भाग राहणार नाही. Florida: कॅनडाला 51 वे राज्य बनवण्यासाठी 'आर्थिक शक्ती'चा वापर करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; ट्रुडो यांनी दिली प्रतिक्रिया .

New York Times च्या माहितीनुसार, Carney हे संसदेत निवडून आलेले नाहीत. त्यांच्या पक्षाकडे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जागाही कमी आहेत. यामुळे मे महिन्यापर्यंत निवडणुका होण्याची अपेक्षा आहे.

Mark Carney 2008 च्या आर्थिक संकटादरम्यान बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर होते. नंतर बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणून काम केले होते, जिथे त्यांनी Brexit transition चे नेतृत्व केले होते. सेंट्रल बँकर म्हणून काम करण्यापूर्वी, त्यांनी गोल्डमन सॅक्समध्ये एक दशकाहून अधिक काळ काम केले. बँक ऑफ इंग्लंड सोडल्यापासून, Carney यांनी कॉर्पोरेट बोर्डांवर वरिष्ठ भूमिका बजावल्या आहेत आणि ते green investment चे प्रमुख समर्थक आहेत.