धक्कादायक : तयार पुलाव पाकिटात आढळला मेलेला उंदीर; ग्राहकाने उपस्थित केले हे प्रश्न
Phtoo Credits: @GaryPolmeer Twitter

तयार पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक फूड चेन जितक्या लोकप्रिय आहेत, तितक्याच त्या त्यांच्या खाद्यपदार्थांच्या दर्जावरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. नुकतेच इंग्लंडच्या कॅम्ब्रिज शहरातील Mcdonaldsच्या केचअप डिस्पेंसरमध्ये जिवंत किडे आढळले होते. किंवा काही ठिकाणी अनेक दिवसांचे शिळे अन्न लोकांना पुरवण्यात आले होते. याच धर्तीवर आता चक्क एका पुलाव (तांदूळ) पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळला आहे. यावरूनच आता पॅकेटबंद पदार्थ अथवा रेडिमेड पदार्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रिचर्ड लीच नावाच्या व्यक्तीने ट्वीट करून बातमी शेअर केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये रिचर्ड Lidl UK कंपनीला, हा मेलेला उंदीर एका बंद असलेल्या पॅकेटमध्ये कसा गेला? असा प्रश्न विचारत आहे. त्याचसोबत आपेल घर हे संपूर्ण दुर्घंधीने भरले असून, आपल्या पत्नीला उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे असे रिचर्ड याने पुढे नमूद केले आहे.

अलिकडे लोकांमधील बाहेरील पॅकेटबंद पदार्थ खाण्याची वाढलेली क्रेझ पाहता, जर का रेडिमेड पदार्थ पुरवणाऱ्या कंपन्या अशाप्रकारचे दर्जाहीन पदार्थ पुरवू लागल्या तर लोकांची बाहेर खायचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.