Helicopter Crash प्रतिकात्मक प्रतिमा (PC- pixabay)

Pakistan Chopper Crash: उत्तर पाकिस्तान (Northern Pakistan) मध्ये मारी पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (Mari Petroleum Company Limited, MPCL) च्या मालकीचे चार्टर्ड हेलिकॉप्टर कोसळले (Chartered Helicopter Crash). या अपघातात किमान 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. हे हेलिकॉप्टर उत्तर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका खाजगी कंपनीने भाड्याने घेतले होते. अफगाण सीमेजवळील उत्तर वझिरीस्तान भागात टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच ते क्रॅश झाले. वैमानिकांनी हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, टेल रोटर जमिनीवर आदळल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हेलिकॉप्टरमध्ये दोन परदेशी वैमानिकांसह एकूण 21 जण होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक तपासणीत पुष्टी झाली आहे. मारी पेट्रोलियम वझिरीस्तान ब्लॉकमध्ये कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार, इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे शेवा येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. लँडिंग दरम्यान, टेल रोटर जमिनीवर आदळले, ज्यामुळे हेलिकॉप्टर उलटले. (हेही वाचा -Helicopter Crash Caught on Camera in Kedarnath: केदारनाथमध्ये लष्कराच्या MI-17 हेलिकॉप्टर कोसळले,अपघाताचा थरार व्हिडिओ व्हायरल)

हेलिकॉप्टरमध्ये 21 लोक होते, ज्यात सहा क्रू सदस्य, एक सुरक्षा अधिकारी आणि 14 प्रवासी होते. जखमींना बाहेर काढण्यासाठी पेशावरहून लष्करी हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. जखमींना विमानाने सीएमएचमध्ये नेण्यात आले. (हेही वाचा- Russian Helicopter Crashes: 22 जणांसह बेपत्ता झालेले रशियन हेलिकॉप्टर कोसळले; 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले)

गेल्या दशकात पाकिस्तानचे सशस्त्र दल आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अनेक हवाई अपघात झाले आहेत. 2022 मध्ये, खैबर पख्तुनख्वा येथे प्रशिक्षणादरम्यान लष्करी हेलिकॉप्टर क्रॅश झाले, त्यात त्याचे दोन्ही पायलट ठार झाले होते. तथापी, 2020 मध्ये, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक एअरबस जेट दक्षिणेकडील कराची शहराच्या गर्दीच्या निवासी जिल्ह्यात क्रॅश झाले, त्यात बहुतेक 99 लोकांचा मृत्यू झाला होता.