Kathleen Storm Video: ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये धोकादायक वादळ, उड्डाणे रद्द, वीजपुरवठा खंडित, पाहा व्हिडीओ
Kathleen Storm

Kathleen Storm Video: ब्रिटन आणि आयर्लंडला वेढले आहे. लाखो लोक वीजेशिवाय अंधारात बसले आहेत , वादळामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बंद करावे लागले हे संपूर्ण कॅथलीन चक्रीवादळामुळे करण्यात आले आहेत. ताशी 70 मैल वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी आयर्लंड आणि ब्रिटनचा काही भाग हादरला आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, हिथ्रो विमानतळावर विमानांनाही उतरणे कठीण झाले आहे. धावपट्टीला स्पर्श केल्यानंतर ब्रिटिश एअरवेजच्या विमानाला पुन्हा आकाशात उड्डाण करावे लागले. त्या विमानात बसलेल्या प्रवाशांचे काय झाले असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. शनिवारी यूके विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या 140 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. आयर्लंडमधील जवळपास 34,000 घरांची वीज गेली आहेत.

कॅथलीन वादळाच्या थराराचा अंदाज तुम्ही  यावरून लावू शकता की, उत्तर आयर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'टायटॅनिक बेलफास्ट' देखील बंद करावे लागले. वादळामुळे त्याच्या छताचे नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने सांगितले की, स्कॉटलंडच्या ड्रुमलबिनमध्ये ताशी ७३ मैल वेगाने वारे वाहत आहेत. जोराच्या वाऱ्यामुळे M48 सेव्हर्न ब्रिजही बंद करावा लागला. हवामान कार्यालयाने कॉर्नवॉल, वेल्स, लँकेशायर, कुंब्रिया, मध्य स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये चेतावणी जारी केली आहे.

या वादळात एक चांगली बातमी समोर आली आहे की, ब्रिटनच्या काही भागात शनिवारी या वर्षीचा सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला, जेव्हा तापमान 20.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले.

मात्र, अजूनही पुराचा धोका कायम आहे. पर्यावरण संस्थेने इंग्लंडमध्ये 14 पुराचे इशारे आणि 118 अलर्ट जारी केले आहेत. वेल्समध्येही पाच पुराचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

कॅथलीन वादळामुळे ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. आशा आहे की, लवकरच परिस्थिती सामान्य होईल आणि लोक सामान्य जीवन जगू शकतील.