Japan Rocket Blast: जपानी रॉकेटचा प्रक्षेपणानंतर अवघ्या 5 सेकंदात स्फोट; घटना कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ
Japan Rocket Blast (फोटो सौजन्य - X/@MarcusHouse)

Japan Rocket Blast: जपानच्या स्पेस वन (Space One) कंपनीच्या रॉकेटचा टेक ऑफ झाल्यानंतर लगेचच स्फोट (Japan Rocket Blast) झाला. वृत्तसंस्था IANS नुसार, स्पेस वन कंपनीच्या रॉकेटने बुधवारी उड्डाण केले. मात्र, कैरोस रॉकेट (Kairos Rocket) चा टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदात स्फोट झाला. माहितीनुसार, जपानच्या स्पेस वन कंपनीचा उपग्रह कक्षेत ठेवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. मात्र, स्पेस वन कंपनीचा हा प्रयत्न फसला.

टेक ऑफ केल्यानंतर रॉकेटचा स्फोट -

कैरोस रॉकेटने भारतीय वेळेनुसार, सकाळी 7.30 वाजता पश्चिम जपानच्या वाकायामा प्रांतातील प्रक्षेपण साइटवर उड्डाण केले. तथापि, 18-मीटर-लांब, चार-स्टेज सॉलिड-इंधन रॉकेटचा टेकऑफनंतर स्फोट झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (वाचा - China Restaurant Blast Video: चीन मध्ये Yanjiao भागात रेस्टॉरंट मध्ये भीषण स्फोट (Watch Video))

गेल्या वर्षीही रॉकेटमध्ये स्फोट -

शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रॉकेटचा स्फोट झाल्यानंतर आकाशात धूर आणि आगीचे दृश्य दिसत होते. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये आणखी एका जपानी रॉकेटच्या इंजिनचा प्रक्षेपणानंतर सुमारे 50 सेकंदांनंतर स्फोट झाला होता.