इंडोनेशिया येथे पावसाच्या पुरात 29 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
इंडोनेशिया पुर परिस्थिती (Photo Credits-Twitter)

इंडोनेशिया (Indonesia) येथे पडलेल्या मुसळधार पावसाच्या पुरामध्ये 29 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेकजण बेपत्ता झाले असल्याची माहिती देण्यात येत आहे. आपत्कालीन यंत्रणेने याबद्दल अधिक माबिती दिली असून 29 जाणांचा मृत्यू तर 13 जण बेपत्ता झाले आहेत.

लामपुंग येथे शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे भुस्खलन झाले. त्यामध्ये एका परिवारातील 6 जणांचा मृत्यू झाला. या पुराच्या परिस्थित जवजवळ दोन हजारांपेक्षा अधिकजणांना आपले घर सोडावे लागले आहे. तर सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून फार मोठ्या प्रमाणात इंडोनेशियातील नागरिकांचे हाल झाले आहेत.

मात्र काही जणांनी मानवनिर्मित संकटामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे म्हटले आहे. यापूर्वी सुद्धा पापुआच्या भागात अचानक महापुरात 79 जणांचा मृत्यू झाला होता.