Firing | (Photo Credits: Pixabay)

Firing Inside Gay Club in Colorado: अमेरिकेतील कोलोरॅडो (Colorado) स्प्रिंग्स येथील गे नाईट क्लब (Gay Club) मध्ये झालेल्या गोळीबारात (Firing) पाच जण ठार तर 18 जण जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, गोळीबाराची घटना रविवारी घडली. एका बंदूकधाऱ्यावर गे क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गुन्ह्याच्या ठिकाणाहून समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये गे क्लबबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस दिसत आहेत. त्याच वेळी, ज्या क्लबमध्ये शूटिंग झाले त्या क्लबच्या बाहेर अनेक रुग्णवाहिका उपस्थित आहेत. यूएस मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेंबरन्स, किंवा टीडीओआरच्या दिवशी झाला. हा दिवस ट्रान्सफोबियामुळे मरण पावलेल्या प्रत्येकाच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. (हेही वाचा - Rishi Sunak: युक्रेन रशिया युध्दात नवा ट्विस्ट, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा युक्रेन दौरा करत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची घेतली भेट!)

यूएस मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, हल्लेखोराने स्निपर रायफल वापरली आणि कमीतकमी 10 लोकांना गोळ्या घातल्या, ज्यांची प्रकृती गंभीर आहे. मात्र, हल्लेखोराचा तपशील, त्याचा हेतू आणि गोळीबारात जखमी झालेल्यांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.