PM Narendra Modi | Photo Credits: Twitter

ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कॉन्झर्व्हेटीव्ह पार्टीने (Conservative Party) आज पुन्हा विजय मिळवला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या नेतृत्त्वामध्ये कॉन्झर्व्हेटीव्ह पार्टीने आज 326 हा बहुमताचा आकडा पार केला आहे. आजचा हा विजय 1980 साली मार्गेट थॅचर यांच्यानंतर कॉन्झर्व्हेटीव्ह पार्टीचा हा मोठा विजय मानला जात आहे. या विजयामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Indian PM Narendra Modi)  यांनी ट्वीटरच्या माध्यमातून बोरिस जॉन्सन यांचं कौतुक केलं आहे. तर बोरिस यांच्या पंतप्रधानपदाच्या राजकीय कारकीर्दीला शुभेच्छा देत भारत-पाक संबंध दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हाऊस ऑफ कॉमन्सच्या एकूण 650 पैकी 642 जागांच्या निकालांपैकी कॉन्झर्व्हेटीव्ह पार्टीने 358 जागांवर विजय मिळवला आहे. तर लेबर पार्टीने 203 जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान लेबर पार्टीच्या जेरेमी कॉर्बिन यांनी आज पराभवाची जबाबदारी स्वीकारत नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कॉन्झर्व्हेटीव्ह पार्टीला 318 तर लेबर पार्टीला 262 जागी विजय मिळाला होता.

PM Narendra Modi Tweet  

युके मधील निकालामुळे आता बोरिस जॉन्सन पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासोबतच या निकालामुळे आता ब्रिटनला युरोपियन युनियनमधूनही बाहेर पडण्याचादेखील मार्ग खुला होणार आहे.