PM Sheikh Hasina On Rohingya: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी रोहिंग्या (Rohingya) स्थलांतरितांचे वर्णन बांगलादेशसाठी मोठे ओझे असल्याचे केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, दहा लाखांहून अधिक रोहिंग्या स्थलांतरितांचा बांगलादेशवर मोठा भार आहे. भारत या मुद्द्यावर मोठी भूमिका बजावू शकतो आणि ते त्यांच्या मायदेशी परत जावेत यासाठी देश आंतरराष्ट्रीय समुदायाशी चर्चा करू शकतो. मला वाटते की भारत ही समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. बांगलादेशातील लाखो रोहिंग्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या राजवटीला आव्हाने निर्माण झाली असल्याची कबुली हसीनाने एएनआयशी बोलताना दिली.
शेख हसीना पुढे बोलताना म्हणाल्या की, हे आमच्यासाठी मोठे ओझे आहे. आपल्या देशात 11 लाख रोहिंग्या आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आमच्या शेजारी देशांशी देखील सल्लामसलत करत आहोत. त्यांनीही काही पावले उचलली पाहिजेत जेणेकरून ते मायदेशी परत जातील. (हेही वाचा - Prime Minister Of Britain: सोमवारी ब्रिटनला मिळणार नवे पंतप्रधान, कोण होणार पंतप्रधान लिझ ट्रस की ऋषी सुनक?)
#WATCH via ANI Multimedia | Bangladesh PM Sheikh Hasina‘s interview to ANI https://t.co/tinJufQTaX
— ANI (@ANI) September 4, 2022
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने मानवतावादी पैलू लक्षात घेऊन विस्थापित समुदायाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मानवतावादी आधारावर आम्ही त्यांना आश्रय देतो आणि सर्व काही पुरवतो. कोविड काळात आम्ही सर्व रोहिंग्या समुदायाचे लसीकरण केले. पण ते इथे किती दिवस राहणार? त्यामुळे ते छावणीतच आहेत. काही लोक अमली पदार्थांची तस्करी, महिलांची तस्करी करतात आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ते जितक्या लवकर मायदेशी परततील, ते आपल्या देशासाठी आणि म्यानमारसाठीही चांगले आहे.
त्यांना पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, आम्ही त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आसियान किंवा संयुक्त राष्ट्रांसारख्या इतर देशांशी चर्चा करत आहोत, असेही यावेळी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या. पंतप्रधान हसीना सोमवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.