Indian Woman Murdered in Australia: भारतीय महिलेची ऑस्टेलियात हत्या, मृतदेह कचराकुंडीत आढळला

परदेशात भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियात देखील घडली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia Crime) भारतीय महिलेची हत्या (Indian Woman Murdered) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचा मृतदेह कचराकुंडीत सापडला आहे. या महिलेची हत्या झाल्याचा आरोप महिलेच्या पतीकडून करण्यात आला आहे. ही महिला गेल्या काही दिवसांपासून गायब होती. या घटनेमुळे परिसरात सध्या खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे.  (हेही वाचा - Attack on Teen Girls: मेलबर्न येथील 14 वर्षीय मुलीवर किशोरवयीनांचा हल्ला (Watch Video))

भारतीय महिला चैतन्या मधागनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या कुंटुंबासोबच ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. ती मुळ हैदराबाद येथील असून ऑस्ट्रेलियातील बुकले परिसरात आपल्या पती आणि मुलासोबत ती राहत होती.  चैतन्या मधागनी हिची पती अशोक राज हा आपल्या 5 वर्षाच्या मुलासह 5 मार्चला भारतात आला होता. तेव्हापासूनच चैतन्या मधागनी बेपत्ता होती. ती गेल्या काही दिवसांपासून कोणच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर आली होती.

चैतन्या मधागनीचा पती अशोक राज याने ऑस्ट्रेलियातील आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्यांकडे तसेच जवळच्या व्यक्तींकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अशोकने पोलिसांशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच पोलिसांना चौकशीमध्ये पुर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी चैतन्या मधागनीच्या जवळच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान हैदराबादमधील आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी यांनी सांगितले की, ही महिला त्यांच्या भागातील होती आणि त्यांनी त्या महिलेच्या कुटुंबाचीही भेट घेतली आहे. रेड्डी म्हणाले की, महिलेच्या पालकांच्या विनंतीवरून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला महिलेचा मृतदेह भारतात आणण्यासाठी पत्रही लिहिले आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी आपल्या जावयावर हत्येचा आरोप केला आहे.