Pakistan: पाकिस्तानमध्ये पावसामुळे हाहाकार; जनजीवन विस्कळीत, 4 दिवसात मृतांचा आकडा 50 वर
Photo Credit - X

Pakistan : पाकिस्तानमध्ये गेल्या चार दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान 50 जणांचा मृत्यू (Death Toll )झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) हवामान अधिक बिघडल्याने आपत्कालीन सेवांना (Disaster Management) सतर्क राहण्यास सांगितले आहे. पावसाच्या घटनेत मध्य पंजाब प्रांतात वीज पडून सात मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात २१ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. अन्य आठ जणांचा मृत्यू दक्षिणेकडील बलुचिस्तान प्रांतात झाला आहे. त्यामुळे पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत एकूण मृतांची संख्या 50 वर पोहोचली आहे. (हेही वाचा : Indonesia Landslide : इंडोनेशियात पावसाचा कहर! भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू, अफगाणिस्तानमध्ये आकडा ३३ वर)

पंजाब प्रांतात खराब हवामानामुळे शेतकऱ्यांची गव्हाची काढणी थांबली आहे. परिणामी पावसामुळे काढणीला आणखी विलंब झाला आहे. त्याचा परिणाम पिकांवर होणार आहे. पिकांचे नुकसान होईल, असा अंदाज आहे.

2022 मध्ये पाकिस्तानमध्ये आलेल्या पूरामुळे मोठी जीवितहानी झाली होती. पसरलेल्या रोगराईमुळे 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. देशाचा एकतृतीयांश भाग पाण्याखाली गेला असून, ३.३ कोटी लोक प्रभावित झाले आहेत.