Hamas Attack on Israel: हमास (Hamas) या दहशतवादी गटाने इस्त्राईलवर केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यात 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त वृत्तसंस्था एएनआयने हिब्रू भाषक प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिले आहे. हल्ला अधिक मोठा असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच हल्ल्यात जवळपास 1,590 हून अधिक लोकांना गंभीर दुखापत झाली, अनेक जण जखमी झाले. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
स्थानिक नागरिक आणि त्यासोबतच इस्रायल संरक्षण दल (IDF) जवानांनी दिलेल्या माहतीनुसार, सांगितले जात आहे की, हमासने अचानक हल्ला करुन विविध नागरिक तसेच (इस्रायल संरक्षण दल) IDF सैनिकांचे अपहरण करून गाझामध्ये आणले आहे. इस्त्रायलकडे अधिकृत असलेल्या माहिती पेक्षाही ओलीस ठेवलेल्यांची संख्या अधिक असल्याचे हमासने म्हटले आहे. तसेच, त्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही हमासने म्हटल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इस्त्रायलने दिले आहे.
आयडीएफचे प्रवक्ते आणि लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉन्रिकस यांनी सीएनएनला सांगितले की, शनिवारी दहशतवादी गट हमासच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या देशाने पूर्ण नियंत्रण मिळवले नाही. गाझामध्ये अजूनही इस्रायली सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात सक्रिय लढाया सुरू आहेत. आणि दुर्दैवाने, आम्ही अद्याप आमच्या सर्व समुदायांवर आणि आमच्या सर्व तळांवर पूर्ण नियंत्रण स्थापित करू शकलो नाही.
हमासचा लष्करी कमांडर मुहम्मद अल-देफ (Muhammad Al-Deif) यांने या मोहिमेला "अल-अक्सा वादळ" (Al-Aqsa Storm) म्हटले आणि म्हटले की, इस्रायलवरील हल्ला हा महिलांवरील हल्ले, जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीची विटंबना आणि गाझाला सुरू असलेल्या वेढा याला प्रत्युत्तर आहे, असे सीएनएनच्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी 6.30 (स्थानिक वेळेनुसार) च्या सुमारास गाझा पट्टीतून इस्त्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर रॉकेट आणि इतर शस्त्रांचा सलग मारा सुरु करण्यात आला. ज्यामुळे अनेक नागरिकांना हल्ल्याचा सामना करावा लागला. तेल अवीव, रेहोवोट, गेदेरा आणि अश्कलोन या शहरांनाही हमासच्या हल्ल्याचा लक्षनिय झटका बसला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हमासचे अनेक दहशतवादी इस्त्रायलच्या प्रदेशात घुसले असून त्यांनी इस्त्रायली नागरिक आणि अनेक ठिकाणे, भूभाग गावांवर आपला ताबा घेतला आहे.
हमासने केलेला हल्ला इतका तीव्र होता की, प्रसारित झालेल्या अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दक्षिणेकडील Sderot शहराच्या रस्त्यांवर अस्ताव्यस्त स्थितीत पडलेले, विखुरलेले मृतदेह दिसले. वॉशिंग्टन पोस्टने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी रस्त्यांवरील वाहनेही एकत्र जमा केली आणि पेटवून दिली. म्हणण्यानुसार कार गोळ्यांनी भरून टाकल्या गेल्या आणि पेटवल्या गेल्या.दरम्यान, आयडीएफने म्हटले आहे की गाझाच्या उत्तरेकडील झिकिम बीचमार्गे इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात दहशतवाद्यांना ठार केले आहे. IDF म्हणते की त्यांनी दहशतवाद्यांना इस्रायली समुदायांमध्ये घुसखोरी करण्यापासून रोखले.