Representative Image (Photo Credits: Pixabay)

बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना बलात्कार हा प्रकार आता केवळ महिलांपुरता मर्यादित न राहता लहान मुले, पुरुषांवर देखील बलात्कार झाल्याच्या विचित्र घटना ऐकायला मिळत आहे. किंबहुना पुरुषांवर बलात्काराच्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना अमेरिकेत मोन्टाना येथे घडली आहे. सामना ने दिलेल्या वृत्तानुसार, येथे एका तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी या तरुणीला स्थानिक न्यायालयाने 20 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

मोन्टाना येथे राहणा-या आरोपी समांथा स्मिअर्स हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्यानंतर काही दिवसांनी त्या दोघांचे ब्रेकअप झाले. मात्र काही दिवसानंतर समांथाला पुन्हा त्या तरुणाला भेटण्याची इच्छा झाली. मात्र आपले ब्रेकअप झाल्यामुळे तो तिला भेटण्यास नकार देत होता. समांथाकडे त्याच्या घराच्या चाव्या होत्या. त्याच्या जोरावर तिने कु-हाड घेऊन त्याच्या घरात प्रवेश केला. तो तरुण जेव्हा तिच्यासमोर आला तेव्हा तिने त्याच्या हातावर कु-हाडीने वार केला. तो तिला विरोध करत होता अखेर तिने त्याच्या मानेवर कु-हाड ठेवली आणि त्याला धाक दाखवत त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि त्याच्यावर बलात्कार केला.

हेदेखील वाचा- लज्जास्पद! पहिल्या पतीने आपल्या साथीदारांसह महिलेवर केला सामूहिक बलात्कार; गुप्तांगावर दिले सिगारेटचे चटके

त्यानंतर काही वेळाने त्याने तिचे हातात कु-हाड असल्याचे फोटो काढून तेथून पळ काढला आणि तडक पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान समांथाने कु-हाडीच्या साहाय्याने त्याच्या घरात नासधूस केली होती.

समांथाने आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्य़ शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले होते. तसेच त्याचा बराच शारीरिक छळ केला होता असे पोलीस तपासात आढळून आले. याप्रकरणी तिला 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.