जगभरातून बलात्काराची (Rape) अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. आता फ्रान्समध्ये (France) एका 68 वर्षीय व्यक्तीला बलात्कारासंबंधी एका भयानक गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ही व्यक्ती तब्बल 10 वर्षे आपल्या पत्नीला ड्रग्ज देत होती, जेणेकरून अनोळखी व्यक्ती या महिलेवर बलात्कार करू शकतील. हे प्रकरण दक्षिणेकडील शहर एविग्नॉनचे आहे. येथे जवळपास एक वर्ष चाललेल्या चौकशीत एकूण 45 संशयितांची ओळख पटली. एका दुकानात महिलांच्या स्कर्टखालून कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड केल्याच्या आरोपावरून ही व्यक्ती पकडला गेली होती.
त्यानंतर पुढे चौकशीदरम्यान तो पत्नीला ड्रग्ज देत असल्याचे समोर आले. बलात्काराच्या आरोपींमध्ये 24 ते 71 वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त जर्मी बोस प्लॅटिएर म्हणाले की, बलात्काराच्या प्रकरणात इतके पुरावे मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. या माणसाची पत्नी ड्रग्ज घेतल्यानंतर बेशुद्ध व्हायची आणि बलात्कारानंतर तिला काहीही आठवत नव्हते, असे असूनही आमच्याकडे ती घटना सिद्ध करण्यासाठी सर्व काही पुरावे होते.
अजून एक धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती आपल्या पत्नीवरील बलात्काराचे व्हिडिओ शूट करत असे. त्याच्याकडे असे अनेक व्हिडिओज सापडले आहेत. हे सर्व गेल्या एक दशकापासून चालले आहे. या व्हिडिओजमध्ये या महिलेवर अनेक लोक बलात्कार करताना दिसत आहेत. हे सर्व व्हिडिओ पतीच्या संगणकात होते. ही महिला आता 60 वर्षांची आहे. या व्यतिरिक्त, कॉम्प्युटरवर अनेक कॅज्युअल सेक्स मीटिंग साइट्सदेखील सापडल्या आहेत, जिथे ही व्यक्ती पत्नीला ड्रग्ज दिल्यानंतर लोकांना तिचा फायदा घेण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: क्रूरतेचा कळस! Ex-Girlfriend चा बदला घेण्यासाठी प्रियकर पोहोचला 'या' थराला; वाचून अंगावर येईल काटा)
पोलिस आयुक्तांनी सांगितले की, हा पती आपल्या पत्नीला ड्रग्ज देऊन तिला पूर्णतः बेशुद्ध करायचा. तिची शुद्ध हरपल्याची खात्री झाल्यावर लोक तिच्यावर बलात्कार करायचे, सध्या, पती आणि आणखी 32 वर्षीय व्यक्तीला कोठडीत पाठवण्यात आले आहे आणि नऊहून अधिक लोकांची चौकशी सुरू आहे.