अमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु
प्रातिनिधिक प्रतिमा

अमेरिकेमध्ये (America) लास डॅलस (Las Dallas)  शहरात भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील चार जणांवर काही अज्ञातांनी गोळी झाडून हत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र तणाव निर्माण झाला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये चंद्रशेखर सुनकार (वय 44) , लावण्या सुनकार (वय 42) या जोडप्यासोबत त्यांच्या 15 व 10 वर्षीय दोन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांचा कठोर तपास सुरु असला तरीही अद्याप मारेकऱ्यांचा कोणाताच सुगावा लागलेला नाही. तसेच या हत्येमागील कारणही अजून उघड झालेले नाही.

या आधी देखील अमेरिकेत एका शीख धर्मिय कुटुंबाची तसेच वर्जिन आयलँड मध्ये स्थित एका भारतीय व्यापाऱ्याची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती, तसेच काही दिवसांपूर्वी फ्लोरिडा येथील एका डिपार्टमेंट स्टोअर मध्ये झालेल्या गोळीबारात तेलंगणाच्या गोवर्धन रेड्डी यांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर घडलेल्या या प्रसंगाने परदेशी स्थित भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न उभा राहीला आहे. भारतीय तरुणाचा लंडन मध्ये जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू , सुषमा स्वराज यांच्याकडे कुटुंबाने घेतली मदतीसाठी धाव

दरम्यान, मृत व्यक्तींचे देह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, पोलिसांच्या सांगण्यानुसार जो पर्यंत या घटनेचा उलगडा होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार आहे.