Forbes Richest People in US List: भारतीय वंंशाच्या 'या' 7 अमेरिकन नागरिकांंचा फोर्ब्स च्या सर्वात श्रीमंंत व्यक्तींंच्या यादीत समावेश
US Dollars. (Photo Credits: Xinhua/IANS)

Forbes Richest People in US List: अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या फोर्ब्सच्या यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. अभिमानाची बाब म्हणजे यात सात भारतीय-अमेरिकन नागरिकांंचा सुद्धा समावेश असल्याचे समजत आहे. झेस्कॅलरचे सीईओ जय चौधरी (Jay Choudhari), सिंफनी टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि अध्यक्ष रोमेश वाधवानी (Romesh Wadhvani) , वेफियरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंग (Neeraj Singh) , खोसला व्हेंचरचे संस्थापक विनोद खोसला (Vinod Singh), शेरपालो वेंचर्सचे भागीदार कविटरक राम श्रीराम  (Kavitarak Ram Shriram), राकेश गंगवाल आणि वर्कडे सीईओ आणि सह संस्थापक अनील भुस्री (Anil Bhusni)  अशी या सात जणांंची नावे आहेत. तर प्राप्त माहितीनुसार, 2020  च्या यादीमध्ये अ‍ॅमेझॉनचे प्रमुख (Amazon CEO)  जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी सलग तिसर्‍या वर्षी अव्वल स्थान मिळवले आहे. यामध्ये अमेरिकेतील 400 श्रीमंत नागरिकांंचा समावेश आहे.

यंंदाच्या श्रीमंंत नागरिकांंच्या यादीचे वैशिष्ट्य असे की, कोरोना व्हायरसच्या संकटकाळातही अमेरिकेतही आर्थिक संकट निर्माण झाले होते मात्र, याकाळातही 400 श्रीमंत अमेरिकन लोकांच्या एकत्रित संपत्तीत 240 अब्ज डॉलर्स वाढ झाली आहे. त्यांची एकत्रित संपत्ती $ 3.2 ट्रिलियन आहे.

फोर्ब्सच्या यादीतील इतर काही प्रमुख नावांमध्ये फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग, बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे आणि ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांचा ही समावेश आहे.अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या फोर्ब्सच्या यादीतही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. अडीच अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ट्रम्प या यादीत 339 व्या स्थानावर आहे.