Murder | (Photo Credits: PixaBay)

इजिप्तमध्ये (Egypt) एक अत्यंत भीषण हत्याकांड उघडकीस आले आहे. येथे पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीने आपल्या पत्नीचे डोके धडापासून वेगळे केले. एवढेच नाही तर, हत्या केल्यानंतर या विक्षिप्त व्यक्तीने मृतदेहाशेजारी बसून सेल्फीही काढला आणि नंतर तो भयानक फोटो पत्नीच्या कुटुंबीयांना पाठवला. इजिप्तच्या उत्तरेकडील दखलिया प्रांतातील तिरा या छोट्याशा गावात पत्नीच्या हत्येची भीषण घटना समोर येत आहे. दोघांचा विवाह सुमारे 9 वर्षांपूर्वी झाला होता.

ब्रॉडकास्टर अल अरेबियासह इजिप्शियन आणि पॅन-अरब मीडियाच्या वृत्तानुसार, हमादा एल अगौज नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या कुटुंबा डोके धडापासून वेगळे झाल्याच्या शरीराचे फोटो पाठवले आणि नंतर लहान मुलींसमोर फेसबुक लाइव्ह देखील केले. अलराबियाच्या वृत्तानुसार, पीडितेचे नाव झेनब इब्राहिम असे असून तिचे वय 26 वर्षे आहे. रविवारी ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हत्येच्या घटनेचे थेट प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर तिरा गावातील रहिवाशांनी पोलिसांना सतर्क केले.

तक्रारीनंतर, इजिप्शियन पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्याने आपल्या तीन मुलींना मारण्याची धमकी देखील दिली, परंतु पोलिसांनी त्याला तसे करण्यापासून रोखले. आता या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो सांगत आहे की, जो पर्यंत एखादा पत्रकार त्याची बाजू ऐकून ती लोकांसमोर मांडण्यासाठी येत नाही तो पर्यंत तो घराबाहेर पडणार नाही. तो म्हणतो की, पत्रकारांना मला माझी परिस्थिती आणि माझ्यासोबत काय घडले, तसेच ही परिस्थिती का उद्भवली ते सांगायचे आहे. हे सर्व तीन मुलींसाठी आहे. (हेही वाचा: प्रियकराची हत्या, डोके, लिंग कापून बादलीत ठेवले; ड्रग्जच्या नशेत उत्तेजीत महिलकडून Sex Game दरम्यान कृत्य)

तो म्हणतो, ‘जो पर्यंत दूरचित्रवाणी वाहिन्या येऊन माझे निवेदन रेकॉर्ड करत नाहीत, तो पर्यंत मी माझे अपार्टमेंट सोडणार नाही. मला एक मुलाखत द्यायची आहे, जेणेकरून लोकांना कळेल की मी खरोखर कोण आहे आणि कशामुळे मला हे करण्यास प्रवृत्त केले.’ इजिप्तमधील महिलेच्या हत्येबाबतच्या प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, आरोपी व्यक्ती आणि त्याची पत्नी कडाक्याच्या भांडणामुळे दोन वर्षांपूर्वी वेगळे झाले होते.