डोनाल्ड ट्र्म्प Photo credit : File Image

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वादग्रस्त बोलण्यावरून सतत चर्चेमध्ये असतात. अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद हाती घेतल्यापासून अमेरिकेत काम करणार्‍या, राहणार्‍या परदेशी नागरिकांबाबत त्यांची भूमिका कठोर आहे. स्थानिक नोकर्‍यांमध्ये मूळ अमेरिकन लोकांना प्राधान्य मिळावं याकरिता ट्रम्प सरकारने व्हिसा नियमदेखील कडक केले आहेत. मात्र अमेरिकेत जन्म झाला म्हणून अमेरिकेचं नागरिकत्व मिळण्याबाबत  च्या नियमामध्ये बदल करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. एका मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. या व्यक्तव्यावरून अमेरिकेत पुन्हा वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच पक्षातून विरोध होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेच्या कोणत्याही इतर  राष्ट्राध्यक्षांनी याबाबतील आदेश जारी केला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. असे तज्ञांनी सांगितले आहे.  रिपब्लिकन पक्षातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाबाबत टीका केली जात आहे.

संविधानिक अधिकारानुसार, अमेरिकेच्या जमिनीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. गैर-नागरिक,अनधिकृत प्रवाशांच्या मुलांना मिळणारी नागरिकता आता थांबवण्याचा डोनाल्ड ट्र्म्प यांचा मानस आहे. भविष्यात अशाप्रकारचा कोणताही आदेश जारी केला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. असे मत काही तज्ञांनी व्यक्त केलं आहे.