प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Photo)

Dominican Republic Plane Crash: डोमिनिकन रपब्लिकची राजधानी डोमिंगो येथे विमान अपघात झाल्याची घटना घडली आहे. खरंतर बुधवारी रात्रीच्या वेळेस लास अमेरिका एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग दरम्यान एका खासगी विमानाला अपघात झाला आहे. विमानाचे ऑपरेटर हेलिडोस एविएशन ग्रुपच्या अनुसार या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.(Air Force Helicopter Crash: तमिळनाडू मध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या घटनेवर UAE कडून शोक व्यक्त)

या प्रकरणी अधिक माहिती देत असे सांगण्यात आले आहे की, सात प्रवासी आणि एक-दोन क्रू मेंबर्सचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहाजण हे विदेशातील आणि एक स्थानिक नागरिक होता. परंतु मृतांच्या नावाची ओळख अद्याप पटलेली नाही. फ्लाइटराडार 24 यांच्या नुसार, विमान दुर्घटनेवेळी डोमिनिकन रिपब्लिक मध्ये ला इसाबेला आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्लोरिडाच्या मार्गाने जाणार होते. परंतु विमानाने टेकऑफ केल्याच्या 15 मिनिटांतच हा अपघात झाला. परंतु दुर्घटनेमागील कारण समोर आलेले नाही.

Tweet:

Tweet:

विमानाच्या दुर्घटनेनंतर एक विधान जाहीर करत असे सांगण्यात आले की, ही घटना अंत्यंत वेदनादायी आणि दु:खी करणारी आहे. या परिस्थितीत आपल्याला पीडितांच्या परिवारासोबत एकजुट होऊन त्यांच्यामध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. मृतांच्या परिवारावर मोठे संकट ओढावले आहे.