Dog Raped 9-yr-old Girl: 'कुत्र्याने केला माझ्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार'; आईने दाखल केली तक्रार, आरोपी प्राण्याला अटक, तपास सुरु
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Unsplash)

बलात्काराच्या (Rape) बाबतीत आपण अनेक अंगावर काटा आणणाऱ्या घटना ऐकल्या असतील. परंतु आता उत्तर अमेरिकेतील मेक्सिको (Mexico) या देशातून समोर आलेल्या या प्रकरणामुळे कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो. तर इथे एका आईने असा आरोप आहे की घरातील पाळीव कुत्र्याने (Pet Dog) तिच्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. विश्वास ठेवायला कठीण आहे पण खरच एका कुत्र्यावर असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी कुत्र्याला अटक केली आहे व या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही भयानक घटना मेक्सिको सिटीच्या त्लाहुआक भागात घडली. आपल्या मुलीवर पाळीव कुत्र्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. महिला स्वतः तिच्या पीडित मुलीसह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तक्रार दाखल केली. मात्र, तपास पथकाला महिलेच्या या आरोपांवर विश्वास नाही. पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. आपल्या दुसऱ्या पतीला वाचवण्यासाठी ही महिला पाळीव कुत्र्यावर मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पीडितेच्या आईने सांगितले की, घटनेच्या वेळी फक्त पाळीव कुत्राच तिच्या मुलीसोबत घरात होता. चौकशीदरम्यानही पाळीव कुत्र्यानेच आपल्या मुलीवर बलात्कार केला आहे, असे महिलेने ठामपणे सांगितले. मात्र, महिलेच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी कुत्र्यासोबत पीडित मुलीच्या सावत्र वडिलांनाही अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांना संशय आहे की, या सावत्र वडिलांनी मुलीवर बलात्कार केला असावा, व हे कृत्य लपवण्यासाठी कुत्र्याचे नाव पुढे केले जात असेल. (हेही वाचा: उडत्या विमानात चक्क मांजरीला 'स्तनपान' करू लागली महिला; प्रवाशांनी केली तक्रार, जाणून घ्या काय घडले पुढे...)

या प्रकरणामध्ये नक्की कोण गुन्हेगार आहे हे ठरवण्यासाठी सध्या मुलीच्या डीएनए नमुन्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याचबरोबर महिलेचीही चौकशी सुरू आहे. तिची मानसिक स्थितीही तपासली जात आहे. मुलीवर उपचार सुरु असून, तिचे डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच सत्य काय ते समोर येईल.