Coronavirus Outbreak. (Photo Credits: IANS)

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव अमेरिका (United States) देशात अधिकाधिक वाढत चालला आहे. अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. तर मृत्यूने अमेरिकेत अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1783 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. काल अमेरिकेत कोरोनाग्रस्त 2000 नागरिकांचा बळी गेला होता. तर आता पर्यंत अमेरिकेत तब्बल 16500 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 4 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. (अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी COVID-19 बाधित तब्बल 2,000 नागरिकांचा मृत्यू)

कोरोना व्हायरसमुळे 184 हून अधिक देश प्रभावित झाले आहेत. फ्रान्स मध्ये 1,18,783, जर्मनीमध्ये 1,18,235 कोरोना बाधित आहेत. स्पेनमध्ये 15 लाख 447 हजार तर इटलीत 18 लाख 279 हजार नागरिक कोरोना बाधित आहेत. जगभरात एकूण 16 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून यात मृत पावलेल्यांची संख्या 95 हजार इतकी आहे.

ANI Tweet:

जगभरासह भारतात देखील कोरोनाचा विळखा वाढत आहे. भारतात तब्बल 6 हजार 725 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ही संख्या दिवसागणित वाढत आहे. तर कोविड 19 बाधित 227 नागरिकांचा देशभरात मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे उपचारानंतर 635 नागरिक बरे झाले आहेत.