सहकार्‍याने घट्ट मिठी मारल्याने बरगड्याची 3 हाडं तुटल्याचा दावा करत महिलेने त्याला खेचलं कोर्टात!

एका चीनी महिलेने तिच्या सहकार्‍याने घट्ट मिठी मारल्याने बरगड्यांची 3 हाडं मोडल्याची तक्रार केली आहे.या महिलेने तिच्या सहकार्‍याला Yunxi Court मध्ये नेले आहे. तिने याबाबत आर्थिक मदत देखील मागितली आहे. rib-breaking hug च्या बदल्यात तिने ही मागणी केली आहे. ही महिला चीनच्या Yueyang शहरातील Hunan province मधील आहे. तो ऑफिसमध्ये चॅटिंग करत असताना तिचा एक सहकारी आला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली.

महिलेला घट्ट मिठी मारताच ती वेदनेने कळवळली. IOL च्या रिपोर्ट्सनुसार, या महिलेने ऑफिस मधून बाहेर पडल्यानंतरही छातीत वेदना होत असल्याचा त्रास बोलून दाखवला. घरी गेल्यावर तिने गरम तेल छातीवर लावले आणि झोपी गेली. त्यावेळीस तिने वैद्यकीय मदत घेणं टाळलं.

5 दिवसांनंतर जेव्हा तिला त्रास असह्य झाला तेव्हा तिने हॉस्पिटल गाठलं. हॉस्पिटल मध्ये एक्स रे काढल्यानंतर उजव्या बाजूला दोन आणि डाव्या बाजूला एका बरगडीला दुखापत झाल्याचं तिला कळालं.

महिलेला ज्या सहकार्‍याने मिठी मारल्याने हा त्रास झाला त्याला तिने भेटल्यावर आर्थिक मदत मागितली. दरम्यान तिला झालेली इजा ही या सहकार्‍याच्याच मिठीने झाली आहे याचा मात्र तिच्याकडे कोणताही पुरावा नाही. तिला या रिकव्हरीच्या काळात ऑफिस मधून सुट्टी घ्यावी लागली त्याचा तिला आर्थिक फटका देखील बसला. न्यायाधीशांनी देखील कोर्टात सहकार्‍याला 10 हजार युआन (1.16 लाख रूपये) मदत देण्याचे निर्देश दिले. हे देखील नक्की वाचा: Gurugram: केयरटेकरकडून 13 महिन्यांच्या मुलाचा छळ, शरीराचे हाड मोडले; रडल्याच्या कारणावरुन कृत्य .

कोर्टाने महिलेची बाजू घेत तिने मागील 5 दिवसांमध्ये अशी कोणतीही गोष्ट केलेली नाही ज्यामुळे तिच्या बरगड्यांचं नुकसान होऊ शकतं असं म्हटलं आहे.