मुलं जन्म दिल्यास 11.50 लाख रुपयांची रोकड आणि वर्षभराची सुट्टी, जाणून घ्या कोण देतेय 'ही' ऑफर
Image used for representational purpose (Photo Credits: Pexels)

चीनकडून दीर्घकाळ सिंगल चाइल्ड पॉलिसी अंमलात आणली जात होती. त्यामुळे चीन मधील एकूण लोकसंख्येत अधिक वय असलेल्यांची संख्या अधिक आणि तरुणांची संख्या कमी होऊ लागली. यावर तोडगा काढण्यासाठी आता चीनच्या सरकारकडून अधिक मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बंपर ऑफर आणली आहे. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, तिसरे मुल जन्माला घातल्यास कंपनी कर्मचाऱ्याला एका वर्षापर्यंत सुट्टी आणि 11.5 लाखांचा बोनस देणार आहे.

National Business Daily च्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये बेबी बोनस, एक्सटेंडेड पेड लीव्स, टॅक्समध्ये सूट आणि मुलांचे पालनपोषण करण्यासाठी सब्सिडीची सुविधा दिली जाणार आहे. सरकारकडून ही लोकांना तिसरे मुल जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारच्या व्यतिरिक्त कंपन्यासुद्धा लोकांना यासाठी बोनस देत आहे.(Congo: काँगोमध्ये 51 जणांना सुनावली फाशीची शिक्षा; UN च्या तज्ज्ञांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय)

Beijing Dabeinong Technology Group आपल्या कर्मचाऱ्यांना तिसरे मुल जन्माला घातल्यास 90 हजार युआन (11.50 लाख) रुपयांसह वर्षभराची सुट्टी देत आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पहिल्या मुलासाठी जवळजवळ 3.54 लाख रुपये आणि दुसऱ्या मुलासाठी 7 लाख रुपये देते.

चीनची लोकसंख्या सातत्याने पाचव्या वर्षात कमी झाली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनची लोकसंख्या 1.4126 बिलियन होती. पाच लाखांपेक्षा कमी वृद्धी नोंदविली गेली. तर जन्मदरात सातत्याने पाचव्या वर्षात घट झाली. चीनमध्ये तरुणांची संख्या कमी होत असून वृद्धांची संख्या वाढत आहे. यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीवर त्याचा प्रभाव पडत आहे.