Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

भारत आणि चीन मधील संबंध दिवसागणिक तणावग्रस्त बनत चालले आहेत. दरम्यान चीन सरकारच्या Global Times च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य Line of Actual Control पार करून पुढे आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान Pangong Tso Lake च्या दक्षिण भागावर हा प्रकार झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच लदाख मधील या भागात एलएसीवर गोळ्यांच्या काही फैर्‍या झाडल्याची माहिती देण्यात आली आहे. ही घटना सोमवार (7 सप्टेंबर) रात्रीची आहे.

चीन कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीमध्ये हा संघर्ष भारतीय जवान सीमारेषेच्या पार गेल्यानंतर झाला आहे. तसेच हे भारतीय लष्कराकडून 'वॉर्निंग शॉर्ट्स' होते असा देखील दावा केला जात आहे. सोमवारी भारतीय सैन्य दलाने सीमारेषा पार केल्याची माहिती चीनकडून दिली जात आहे.

Global Times' Tweet

दरम्यान जून महिन्यात गलवान खोर्‍यात चीन आणि भारतीय सैन्यामध्ये संघर्ष झाला होता. त्यावेळेस 16 भारतीय जवानांना धारदार वस्तूंचा वापर करून जखमी करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी पुन्हा लडाख मध्ये चीनच्या पीएलए (PLA Activity )सैनिकांनी संघर्षाबाबत लष्करी आणि राजनैतिक चर्चे दरम्यान याआधी झालेल्या सहमतीचा भंग केला आहे. तसेच जैसे थे परिस्थितीत बदल घडवणाऱ्या चिथावणीखोर लष्करी हालचाली झाल्या आहेत. मात्र हा प्रकार लक्षात येताच भारतीय सैन्याने प्रतिबंध करत आपली स्थिती मजबूत करण्यासाठी पावले उचलली आणि जमिनीवरच्या तथ्यात बदल घडवण्याचा चीनचा हेतू विफल ठरवला होता.