Brazil Bank Robbery: चोरट्यांनी सिनेमा स्टाईलने लुटली बँक, जीव वाचवण्यासाठी वापरला 'हा' मार्ग (Watch Video)
Bank robbers in Brazil use hostages as human shields (Photo Credits: Twitter)

ब्राझीलमधून (Brazil ) बँक दरोड्याची एक बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तेथील चोरट्यांनी फिल्मी स्टाइलमध्ये बँक लुटली आहे. परंतु पोलिसांना या दरोड्याची माहिती मिळताच सशस्त्र चोरट्यांनी पळून जाण्यासाठी ढाल बनवून सामान्य नागरिकांना कारशी बांधले. पोलिसांच्या गोळ्यांना टाळण्यासाठी डाकूंनी किमान 10 जणांना आपल्या गाडीला बांधून त्यांना ढाल बनवले आणि स्वतःचा बचाव केला. (Afghanistan-Taliban Conflict: अमेरिकेने अफगाणिस्थानातून सैन्य मागे घेतल्यावर तालिबान्यांनी केला जल्लोष साजरा, आता पुर्णपणे स्वातंत्र्याची केली घोषणा)

या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यात बँक लुटल्यानंतर अराकातुबाच्या रस्त्यावर सामान्य नागरिकांना गाडीला बांधून खुलेआम गोळीबार करत असल्याचे पाहिले जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, पोलीस या घटनेचा गंभीरपणे तपास करत आहेत. बँक लुटणाऱ्या डाकूंची संख्या किमान 50 होती , असे तपासात पोलिसांना कळले आहे.

या डाकूंनी बँक दरोड्यासाठी रस्त्यावर सशस्त्र बंकर आणि चौकीदारांना लक्ष्य केले होते, त्यानंतर मानवी ढाल बनवून आणि अगदी सहजपणे रस्त्यावर गोळीबार करून किमान 10 लोकांना लुटण्यात आल्याचेही अहवालात समोर आले आहे.

पोलिसांना पाठलाग करता येऊ नये म्हणून या बदमाशांनी शहरातून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्ते पेटवले आणि पोलिसांपासून बचाव होईपर्यंत लोकांना काही काळ त्यांच्यासोबत ओलीस ठेवले. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर गोळीबाराचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत तसेच काही ओलिस ठेवलेल्या लोकांना ही या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते.