पाकिस्तान: कराची येथील चिनी दुतावास कार्यालयावर बॉम्बहल्ला
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

पाकिस्तानच्या (Pakistan) कराची (Karachi) येथे चिनी दुतावासा कार्यालयाजवळ (Chinese Consulate) मोठा बॉम्बहल्ला (Blast) झाला आहे. या हल्ल्यानंतर गोळीबारही करण्यात आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर हाती आलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. हा दहशतवादी हल्ला असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानमधील हा परिसर 'रेड झोन म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी जगातील अनेक देशांची कार्यालये आहेत. कडेकोर सुरक्षा असूनही 3-4 हल्लेखोरांनी चीन दुतावासाच्या कार्यालयात घुसकोरी करत हल्ला केला.