बीएमडब्ल्यू लोगो (Photo Credit : Instagram)

जर्मनीची कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने 10 लाख डिझेल कार परत मागवल्या आहेत. एक्झॉस्ट सिस्टमला आग लागत असल्याने कारण देत कंपनीने कार्स परत घेतल्या आहेत.

बीएमडब्ल्यूच्या कारच्या एक्झॉस्ट सिस्टममध्ये प्रॉब्लेम असून त्यातून ग्लायकोल कुलिंग फ्लूईड लिकेज होत आहे. ते इतर पदार्थांच्या संपर्कात आल्याने आग लागण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी कंपनीने कार्स परत मागवल्या आहेत, असे कंपनीने सांगितले.

यासाठी कंपनी विक्रेत्यांना संपर्क करुन अशा कारधारकांकडून कार परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर एक्झॉस्ट रिसर्क्युलेशन मॉड्युल तपासून त्यात काही प्रॉब्लेम असल्यास तो पार्ट बदलण्यात येईल, असेही कंपनीने सांगितले.

यापूर्वी ऑगस्टमध्ये याच समस्येमुळे 4.8 लाख कार्स परत मागवल्या होत्या. साऊथ कोरियात 30 कार्सला आग लागली होती. याप्रकरणी कंपनीने माफी देखील मागितली होती.