अमेरिकीचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama), बिल क्लिंटन (Bill Clinton) आणि जॉर्ज बूश (George Bush) हे कॅमेऱ्यावर कोरोना व्हायरस लस (Coronavirus Vaccine) टोचून घेणार आहे. CNN च्या रिपोर्टनुसार, लसीबद्दल लोकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तिन्हीही माजी राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना उत्पन्न होण्यास मदत होईल, अशी आशा आहे. दरम्यान, अमेरिकेचे आरोग्य अधिकारी लोकांमध्ये लस टोचून घेण्यासंदर्भात जनजागृती करत आहेत.
लसीला मान्यता मिळाल्यानंतर लोकांनी लसीचा स्वीकार करण्यासाठी आम्ही जी मदत लागेल ती करु, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बुश आणि ओबामा यांनी Dr Anthony Fauci यांना सांगितले. लस सुरक्षित असून तुम्ही लस घेऊ शकता आणि कोविड-19 पासून सुरक्षित राहू शकता, अशी खात्री जर Dr Anthony Fauci देत असतील. तर मी नक्की लस घेईन, असे बराक ओबामा म्हणाले. तसंच Dr Anthony Fauci या मोठ्या डॉक्टरांना मी खूप काळापासून ओळखतो आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
अमेरिकेमध्ये दर दिवसाला 2,700 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. एप्रिल पासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. बुधवारी आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत 2731 रुग्णांचा मृत्यू झाला असून अजूनपर्यंत कोरोनामुळे 273,181 रुग्णांचा बळी गेला आहे.
लसीला मान्यता मिळाल्यानंतर लसीचे लवकरात लवकरत उत्पादन करुन डिसेंबर महिन्यातच लसीकरणाला सुरुवात करावी, अशी योजना असल्याचे अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केले. (Britain ठरला Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine च्या वापराला मंजुरी देणारा जगातील पहिला देश; पुढील आठवड्यापासून लसीकरण शक्य)
दरम्यान, अमेरिकेत फायझर-बायोएनटेक या दोन लसीला लवकरच मंजूरी मिळाली असून मॉडर्ना लसीला लवकरच मंजूरी मिळू शकते. या दोन्ही लसी कोविड-19 विरुद्ध प्रभावी असल्याने कोरोना संकटावर मात करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे.