बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अन्वर (Anwarul Azim Anar) यांची कोलकाता येथे हत्या करण्यापूर्वी ‘हनी ट्रॅप’ (Honey Trap) करण्यासाठी वापरण्यात आलेल्या महिलेला ढाका येथे ताब्यात घेण्यात आले आहे. शिलांती रहमान अशी ही महिला बांगलादेशी नागरिक असून मुख्य आरोपी अख्तरझ्झमान शाहीनची मैत्रीण आहे.  अन्वारुलची हत्या झाली तेव्हा शिलांती कोलकात्यात हजर होती आणि ती 15 मे रोजी मुख्य संशयित मारेकरी अमानुल्ला अमानसह ढाक्याला परतली. बांगलादेशचे अवामी लीगचे (Awami League) खासदार (एमपी) अन्वारुल अझीम (Anwarul Azim Anar) यांचा मृतदेह कोलकाता (Kolkata) येथे बुधवारी (22 मे) सापडला. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.  (हेही वाचा - Bangladesh MP Found Dead in Kolkata: बांगलादेशातील खासदार Anwarul Azim यांचा कोलकाता येथे मृत्यू; हत्येचा आरोप, चौकशी सुरु)

अनवारुलला बांगलादेशातून कोलकात्यात आणण्यासाठी अख्तरझ्झमानने शिलांतीचा हनी ट्रॅप म्हणून वापर केला होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी अद्याप गुन्ह्याच्या हेतूची औपचारिक घोषणा केलेली नसली तरी, काही देयके देण्यावरून झालेल्या वादातून अख्तरझ्झमानने बांगलादेशच्या खासदाराची हत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. अख्तरझ्झमानने गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना सुमारे 5 कोटी रुपये दिले.

पश्चिम बंगाल गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मुंबईतून एका संशयिताला अटक केल्यानंतर या प्रकरणात मोठा यश आले आहे. संशयित जिहाद हवालदार याने न्यू टाऊन फ्लॅटमध्ये बांगलादेशी खासदारासह चौघांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

चौकशीत हवालदारने हा खून अख्तरझ्झमानच्या सांगण्यावरून केल्याचा दावा केला. खासदाराची हत्या केल्यानंतर, अन्वारुलची ओळख नष्ट करण्यासाठी त्यांनी संपूर्ण शरीराची कातडी आणि मांस चिरून टाकले, असे सीआयडी सूत्रांनी सांगितले. त्यानंतर हाडांचे तुकडे करून अनेक प्लास्टिक पॅकेटमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर मारेकऱ्यांनी पाकिटांची कोलकात्याच्या वेगवेगळ्या भागात विल्हेवाट लावली.

व्यावसायिक कसाई हवालदार हा बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील बराकपूरचा रहिवासी असून तो काही काळ मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तो कोलकात्यात आला, असा दावा सीआयडीच्या सूत्रांनी केला