Badar Khan Suri (Photo Credits gufaculty360.georgetown.edu)

अमेरिकेमध्ये भारतीय स्कॉलर Badar Khan Suri यांना ताब्यात घेऊन भारतात पुन्हा पाठवले जाणार आहे. दरम्यान सुरी हे अमेरिकेचे ग्रीन कार्ड होल्डर आहेत. Washington DC येथील Georgetown University मध्ये postdoctoral fellow आहेत. अमेरिकेत जाण्यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या Jamia Milia Islamia university मध्ये शिक्षण घेतलं आहे. सुरी यांच्या वकिलांच्या दाव्यानुसार, त्यांच्यावर कारवाई करण्यामागे त्यांच्या पत्नी पॅलेस्टाईन असल्याचं कारण आहे असे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान गाझा आणि पॅलेस्टाईन हे सुरींच्या कहाणीमध्ये महत्त्वाचे आहे.

Georgetown University च्या वेबसाइटनुसार, Jamia Milia Islamia university चे माजी विद्यार्थी असलेले सुरी "Majoritarianism and Minority Rights in South Asia" हे विषय शिकवत होते आणि त्यांनी भारतातून Peace and Conflict Studies मध्ये पीएचडी केली होती. होमलँड सिक्युरिटी विभागाच्या मुखवटा घातलेल्या एजंटांनी सुरीला त्याच्या Arlington, Virginia येथील घरातून अटक केली आणि त्याचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

मागील आठवड्यात, कोलंबिया विद्यापीठातील एका भारतीय विद्यार्थिनीने कॅम्पसमधील तिच्या पॅलेस्टिनी समर्थक कारवायांबद्दल एजंट्सच्या संपर्कात आल्याचा ठपका ठेवल्यानंतर कॅनडाला सेल्फ डिपोर्टचा मार्ग स्वीकारल्याची बाब समोर आली होती. रंजनी श्रीनिवासन असं तिचं नाव असून अमेरिकेत ती F1 Student Visa वर होती. DHSच्या मते, श्रीनिवासन ही दहशतवादी संघटना असलेल्या हमासला पाठिंबा देणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी होती. नक्की वाचा: भारतीय विद्यार्थीनी Ranjani Srinivasan अमेरिकेतून झाली Self-Deport; जाणून घ्या सेल्फ डिपोर्ट काय असतं? रजनी सोबत काय घडलं .

Srinivasan आणि Badar Khan Suri यांच्यावरील कारवाई ही अमेरिकन विद्यापीठांच्या कॅम्पसमधील कट्टरपंथी समर्थक कारवाया संपवण्याच्या व्यापक ट्रम्प प्रशासनाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. H-1B Visa: 20 मार्चपासून अमेरिका हटवणार या परदेशी कामगारांचे रेकॉर्ड्स, जाणून घ्या कोणावर होणार परिणाम .

Badar Khan Suri यांना मायदेशी का पाठवणार?

अमेरिकेत गृह सुरक्षा विभागातील सहाय्यक सचिव Tricia McLaughlin,यांनी X पोस्ट वर दिलेल्या माहितीनुसार, सुरीचे "एका ज्ञात किंवा संशयित दहशतवाद्यांशी जवळचे संबंध होते आणि ते कॅम्पसमध्ये हमासचा प्रचार करत होते."

दरम्यान सुरींची पत्नी Maphaz Ahmad Yousef मूळची गाझा येथील आहे पण आता ती अमेरिकन नागरिक आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, दोघांचे 1 जानेवारी 2014 ला लग्न झाले आहे. सुरींचे सासरे Ahamed Yousef हे गाझामधील हमास सरकारमध्ये माजी उप-परराष्ट्र मंत्री होते.

अमेरिकेने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.