करण्यात आला. हल्लेखोर हे काही तरुण होते जे उजव्या विचारसरणीच्या तुर्की तरुण गटाचे सदस्य आहेत. या घटनेची पुष्टी करताना स्थानिक राज्यपाल कार्यालयाने सांगितले की, हल्ल्यात सहभागी असलेल्या 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुर्की युथ फेडरेशनने (टीजीबी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (हेही वाचा - Russian Helicopter Crashes: 22 जणांसह बेपत्ता झालेले रशियन हेलिकॉप्टर कोसळले; 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले )
त्यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "आम्ही यूएसएस वास्प या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आक्रमण जहाजावर तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांवर हल्ला केला. अमेरिकन सैनिकांचे हात आमच्या सैनिकांच्या आणि हजारो पॅलेस्टिनींच्या रक्ताने माखलेले आहेत. त्यामुळे ते आमच्या देशाला अपवित्र करू शकत नाहीत. तुम्ही जेव्हाही पाऊल या भूमीवर टाकाल, तेव्हा आम्ही तुमचे असेच स्वागत करू"
टीजीबीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरही शेअर केला आहे. त्याचवेळी, तुर्कस्तानमधील अमेरिकन दूतावासाने या हल्ल्याला दुजोरा देत सैनिक आता सुरक्षित असल्याचे सांगितले. आम्ही त्यांच्या त्वरित प्रतिसादाबद्दल तुर्की अधिकार्यांचे आभार मानतो," असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
इझमीरच्या गव्हर्नरच्या कार्यालयाच्या निवेदनाचा हवाला देत तुर्की मीडियाच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी पक्षाच्या युवा शाखेच्या सदस्यांनी कोनाक शहरात दोन अमेरिकन सैनिकांवर हल्ला केला. या घटनेनंतर पाच अमेरिकन सैनिकांनी हस्तक्षेप केल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सर्व 15 हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.