
बलात्कार पीडित अल्पवयीन मुलाकडून एक महिला गर्भवती झाली आहे. धक्कादायक असे की जी महिला गर्भवती झाली आहे त्याच महिलेने या मुलावर बलात्कार (Woman Raped Boy) केला होता. पीडित मुलाचे वय 14 वर्षे इतके आहे. ही घटना अमेरिकेतील अर्कान्सास (Arkansas) येथील आहे. प्राप्त माहितीनुसार, महिलेवर बलात्काराचा आरोप आहे. गर्भवती असलेली ही महिला आता बाळाला जन्म देणार आहे. ब्रिटनी ग्रे असं या महिलेचं नाव आहे.
द सन आणि इतर काही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार आरोपी महीला ब्रिटनी ग्रे हिने 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर बलात्कार केला. या प्रकरणात आरोपी महिलेला पोलिसांनी अटकही केली. ही घटना सादारण वर्षभरापूर्वी घडली. दरम्यान, या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. घटनेतील साक्षीदाराने पोलिसांना दिलेली माहिती अशीकी, ही महिला आता पीडित मुलामुळे गर्भवती राहिली आहे.
साधारण एक वर्षभरापूर्वी एका व्यक्तीने राज्य बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध विभागाला माहिती दिली होती. या माहितीमध्ये ब्रिटनी ग्रे नामक महिलेने 14 वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापीत केल्याचे म्हटले होते. तसेच, सप्टेंबर 2020 मध्ये या महिलेला (ब्रिटनी ग्रे) पीडित मुलासोबत संबंध ठेवताना आपण प्रत्यक्ष पाहिले होते, असेही माहिती देणाऱ्या व्यक्तीने म्हटले होते. या व्यक्तीने पोलिसांसमोरही तशी साक्ष दिली होती. (हेही वाचा, धक्कादायक! 36 वर्षीय महिलेचा 9 वर्षीय मुलावर बलात्कार)
या प्रकरणातील साक्षीदाराने पोलिसांना अधिक माहिती देताना सांगितले की, ब्रिटनी ग्रे या महिलेने पीडित मुलासोबत प्रदीर्घ काळ शारीरिक संबंध ठेवले. आता या मुलापासून ब्रिटनी ग्रे ही गर्भवती राहिली आहे. तिला दिवस गेले असून काही काळातच ती अपत्याला जन्म देणार असल्याचा दावाही साक्षीदाराने केला आहे.
दरम्यान, प्राप्त माहिती आणि साक्षीदाराने दिलेली साक्ष यावरुन पोलिसांनी सत्यता पडताळून पाहिली. त्यानुसार पोलिसांना ब्रिटनी ग्रे गर्भवती असल्याचे आढळून आले, असे द सनने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. सध्या ती जामीनावर बाहेर आहे.