धक्कादायक! 36 वर्षीय महिलेचा 9 वर्षीय मुलावर बलात्कार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Kerala: केरळ येथे एका 36 वर्षीय महिलेने 9 वर्षीय मुलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आरोपी महिलेवर पोक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मल्लापुरम येथे एक 9 वर्षीय मुलगा आपल्या परिवारासोबत राहतो. तसेच त्याच्या घराच्या जवळच त्याच्या काकाच्या घरातील मंडळी राहातात. तर काकाची बायको आणि पीडित मुलाच्या घरातील मंडळींशी वाकडे होते. मात्र गेल्या एक वर्षापासून काकाची बायको ही पीडित मुलाशी लैंगिक वर्तवणुक करत होती. त्यामुळे मुलाच्या मनावर परिणाम झाला होता. तसेच लैंगिक अत्याचार केल्यानंतर काकाची बायको पीडित मुलाला त्याचा घराजवळ सोडून निघून गेली.

तर गेल्या आठवड्यात पीडित मुलगा त्याच्या घराजवळील दवाखान्यात गेला असता त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे उघडकीस आले. तर डॉक्टरांनी पोलीस आणि चाईल्डलाईन अधिकाऱ्यांच्या मदतीने या मुलाने सांगतलेल्या प्रकाराची नोंद करुन घेतली. या प्रकरणी पोलिसांनी काकाच्या बायकोवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तापस केला जात असल्याचे सांगितले जात आहे.