श्रीलंकेत (Sri Lanka) पुन्हा आज (25 एप्रिल) एकदा बॉम्ब स्फोटाचा आवाज झाला आहे. तर राजधानी कोलंबो पासून 40 किलोमीटर लांब पुगोडा शहरात (Pugoda Town) या हल्ल्याचे आवाज ऐकू आले. याबद्दल रॉयटरने वृत्त दिले असून कोणत्याही प्रकारची हानी झाली आहे की नाही याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र स्फोट कशामुळे झाला हे कळू शकले नाही. परंतु आवाज येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.(हेही वाचा-ईस्टर सणाच्या दिवशी श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट)
Reuters: Blast heard in Pugoda town, 40 km east of Sri Lankan capital Colombo
— ANI (@ANI) April 25, 2019
तर रविवारी ईस्टरच्या दिवशी चार आलिशान हॉटेल्स आणि दोन चर्च मध्ये बॉम्बस्फोट हल्ला झाला. त्यावेळी आठ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. तेव्हा 300 पेक्षा अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर आयसिस या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.