कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला असून गेल्या 3 महिन्यांपासून प्रत्येकजण कोरोनाशी झुंज देत आहे. कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत जवळपास 7 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला असून चीनमधील (China) मृतांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या चीनच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली असून हळूहळू तेथील कार्यलयातील कामाला सुरुवात होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ऑफिस सुरु होऊन काही दिवस झाल्यानंतर ऑफिसला जाण्याचा कंटाळा आल्याने एका कर्मचाऱ्याने आपल्याला करोना झाल्याचे कळवले. त्यानंतर ऑफिसने तातडीने तीन दिवसांसाठी ऑफिसची इमारत बंद करण्याचा निर्णय घेत सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे आदेश दिले. परंतु, संबंधित कर्मचाऱ्याने केलेला दावा संशयित असल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. दरम्यान, या कर्मचाऱ्याचा खोटेपणा सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता 110 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. चीनमध्ये डिसेंबर महिन्यापासून करोनाविरुद्ध युद्धपातळीवर काम सुरु आहे. सध्या चीन येथे कोरोनाची लागण होऊन मृत्यू होणाऱ्या संख्येत घट झाली आहे. याशिवाय तेथील कार्यालये देखील सुरु होत आहेत. ऑफिसला जाण्याचा कंटाळा आल्याने एका कर्मचाऱ्या नवी युक्ती लढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. संबंधित कर्मचाऱ्याने आपल्याला कोरोना व्हायरस झाल्याचे सांगत ऑफिसची सुट्टी मिळवली होती. परंतु, हा कर्मचारी खोटे बोलत असल्याचे संशय आल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. कर्मचाऱ्याने केलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांना त्याला अटक केली. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोनामुळे औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहातील कैद्यांच्या आहारात बदल
एका मॉलमध्ये आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे कर्मचाऱ्याने स्पष्ट केले होते. तो ज्या सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी गेला होता, तिथे एक करोनाग्रस्त रुग्ण आला होता. त्याच्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला होता. मात्र दाव्यामध्ये तो सांगत असणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये पोलिसांना विरोधाभास दिसून आला. त्याने केलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याला 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच या शिक्षेनंतर या व्यक्तीला पुढील सहा महिने प्रोबेशन ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.