भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर अमेरिकेच्या सत्तेचं केंद्रस्थान असलेल्या व्हाईट हाऊस कडून अनफॉलो करण्यात आलं आहे. दरम्यान मोदींच्या अकाऊंटला 3 आठवड्यांपूर्वीच व्हाईट हाऊसच्या ऑफिशिएल अकाऊंटवरून फॉलो करण्यात आलं होतं. मात्र आता अचानक नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासह भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), भारताचं पंतप्रधान कार्यालय (PMO) अधिकृत हॅन्डल, अमेरिकेतील भारतीय दुतावास, भारतातील अमेरिकन दुतावास अशी सहा अधिकृत हॅन्डल्स अनफॉलो करण्यात आली आहेत.
दरम्यान व्हाईट हाऊसच्या या निर्णयावर अद्याप भारताकडून आपली बाजू स्पष्ट करण्यात आलेली नाही. सध्या या गोष्टीवरून 'diplomatic failure'चा दावा करत टीका देखील सुरू झाली आहे. 10 एप्रिल 2020 पासुन व्हाईट हाऊसने ट्वीटर वर भारताच्या महत्त्वाच्या ट्वीटर अकाऊंट्सना फॉलो करण्यास सुरूवात केली होती. 'व्हाईट हाऊस' हे प्रत्येक अमेरिकन राजकीय घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र आहे.
भारतामधील मोदी सरकारचा प्रमुख राजकीय विरोधक कॉंग्रेस पक्षाने देखील याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असुनही असं कसं झालं? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे.
Gaurav Pandhi, कॉंग्रेस नेत्याचं ट्वीट
Turns out, after White House, Donald Trump too has blocked/unfollowed PM Modi. What's happening here?
Govt owes an explanation to people!
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) April 29, 2020
व्हाईट हाऊसकडून फॉलो करण्यात आलेल्या अवघ्या 19 हॅन्डल्समध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटचा समावेश असल्याने जगाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले होते. जगातील इतर कोणताही नेता अमेरिकन प्रशसनाच्या अधिकृत हॅन्डल्वरून ट्विटरवर फ़ॉलो केला जात नव्हता. दरम्यान सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये भारत अमेरिकेमधील मैत्री जपत 'माणुसकीचा धर्म' जपत आपण या संकटावर मात करू अशी ग्वाही देत दोन्ही देशाच्या प्रमुखांनी जनतेला विश्वास दिला होता. मात्र त्यानंतर मागील काही दिवसांमध्ये अमेरिकेत अनेक घडामोडींना वेग आला आहे.