(Photo: Twitter)

अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांवर वांशिक हल्ले (Racial attack) होत आहेत. टेक्सासमधून (Texas) वांशिक हल्ल्याचे एक लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका मेक्सिकन-अमेरिकन महिलेने टेक्सासच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या 4 भारतीय महिलांशी गैरवर्तन केले, इतकेच नाही तर त्यांना मारहाण (Beating) केली, त्यानंतर तिने त्यांना बंदुकीने गोळ्या घालण्याची धमकीही दिली. बुधवारी रात्री ही घटना घडली. टेक्सासमधील डॅलस (Dallas) येथील हॉटेलमध्ये जेवण करून चार भारतीय वंशाच्या महिला पार्किंगच्या दिशेने चालल्या होत्या.

त्यानंतर अचानक एक मेक्सिकन-अमेरिकन वंशाची महिला तेथे आली आणि तिने भारतीय महिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.  व्हिडिओमध्ये आरोपी महिला भारतीय महिलांशी सतत गैरवर्तन करताना ऐकू येत आहे. ती म्हणते, मला भारतीयांचा तिरस्कार आहे. सर्व भारतीय चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत येतात. हेही वाचा Rishi Sunak Gau Pooja: ब्रिटनचे पंतप्रधान पदाचे उमेदवार ऋषी सुनक, पत्नी अक्षता मूर्तीने केली लंडनमध्ये गौ पूजा, पहा व्हिडीओ

आरोपी महिलेने सांगितले की, तिचा जन्म अमेरिकेत झाला, पण ती जिथे जाते तिथे तिला भारतीयच दिसतात. जर भारतात जीवन चांगले आहे तर तुम्ही लोक इथे का आलात. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मेक्सिकन-अमेरिकन चार भारतीय महिलांवर वांशिक टिप्पणी करताना त्यांच्याशी गैरवर्तन करत आहे. भारतीय महिलेने महिलेच्या गैरवर्तनाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली असता, हे पाहून आरोपी महिलेला राग आला आणि त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली.