Indian Student Died in Kyrgyzstan: आंध्र प्रदेशातील वैद्यकीय विद्यार्थ्याचा किर्गिस्तानमध्ये धबधब्यात बुडून मृत्यू, कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर
Drown | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Indian Student Died in Kyrgyzstan: आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. किर्गिस्तान (Kyrgyzstan) मधील धबधब्यात बुडून आंध्र प्रदेशातील एका वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. दासारी चंदू असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. हा विद्यार्थी इतर चार विद्यार्थ्यांसह धबधब्यावर गेला होता, तेही आंध्र प्रदेशचे रहिवाशी होते. धबधब्याच्या बर्फात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला, असे अहवालात सांगण्यात आलं आहे.

अनकापल्ले जिल्ह्यातील मदुगुला गावात राहणारा चंदू हा हलवा विक्रेता भीमा राजू यांचा धाकटा मुलगा होता. एक वर्षापूर्वी तो एमबीबीएस करण्यासाठी किर्गिस्तानला गेला होता. त्यांचे पार्थिव घरी आणण्यासाठी कुटुंबीयांनी भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. (हेही वाचा -Indian Students Dies In America: अमेरिकेतील ॲरिझोना येथे कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू)

दरम्यान, अनकपल्ले खासदार बी. व्यंकट सत्यवती यांनी हा मुद्दा केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी आणि किरगिझस्तानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी बोलून चंदूचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. (Indian Student Shot Dead In Canada: कॅनडामध्ये 24 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची कारमध्ये गोळ्या झाडून हत्या)

दरम्यान, रेड्डी यांनी किर्गिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून चंदूचा मृतदेह भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. दासारी चंदूच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.